
खेड-भरणे मार्गावर दुचाकीवरून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
खेड-भरणे मार्गावर महाडनाका येथे दुचाकीवरून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना येथील पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून दुचाकीसह ६४ हजार ४०० रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला.
योगीराज दयानंद वायगंकर, सतीश रघुनाथ मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेजण
एम.एच. ०८/ए.यु. ९७० क्रमांकाच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून विदेशी मद्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर व त्यांच्या पथकाने सापळा रचला. या दोघांना महाडनाका येथे १४ हजार ४०० रूपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या साठ्यासह ५० हजार रूपये किंमतीची दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.
www.konkantoday.com