एकीकडे पेट्रोलच्या किंमती शंभरच्या वर गेल्या असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे पाप भाजप सरकारने केले -जयंत पाटील
केंद्र सरकारने खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवल्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. एकीकडे पेट्रोलच्या किंमती शंभरच्या वर गेल्या असताना केंद्र सरकारने दुसरा धक्का देत देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढवण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत असताना खतांची दरवाढ करून भाजपशासित केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये ही दरवाढ कमी केली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
www.konkantoday.com