अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यातील पहिला बळी गेला
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा राज्यातील पहिला बळी गेला आहे. रायगडमधील उरण शहरातील बाजारपेठेत भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळल्याची घटना समोर आली आहे
www.konkantoday.com