अकरावी प्रवेशासाठी आता शालेय शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार
दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर १६लाख विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतून प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसह महाविद्यालयांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी आता शालेय शिक्षण विभागातर्फे स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, त्यासाठी शिक्षण तज्ज्ञांची स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती १५ जूनपर्यंत शिक्षणमंत्र्यांना अहवाल देणार आहे
www.konkantoday.com