रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेला आवाहन
अरबी समुद्रामध्ये घोंघावत असलेले ‘तौक्ते’ हे चक्रीवादळ कोणत्याही क्षणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हे लक्षात घेता यावेळी नागरिकांनी खबरदारी घ्यावी. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रामुख्याने जिल्ह्यातील किनाऱ्यालगत वास्तव्य करणाऱ्या मच्छीमार, खारवी, भोई समाजबांधवांनी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन सावध राहून विशेष खबरदारी घ्यावी. चक्रीवादळ झाल्यास आणि दुर्दैवाने कोणताही कठीण प्रसंग वा संकट उद्भवल्यास आपण थेट माझ्याशी किंवा त्या-त्या ठिकाणचे माझे सहकारी जिल्हा परिषद सदस्य यांच्याशी संपर्क साधावा.
विक्रांत जाधव
(अध्यक्ष, जिल्हा परिषद, रत्नागिरी)