घराचे काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा चालू झाल्याने विजेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू

घराचे काम करीत असताना अचानक विद्युत पुरवठा चालू झाल्याने विजेचा धक्का बसून तरूणाचा मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहेही घटना लांजा तालुक्यातील कुवे मावळतवाडी येथे गुरूवार ७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुवे मावळतवाडी येथील प्रकाश शाम नेमण यांच्या नवीन घराचे काम सध्या सुरू आहे. गुरूवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास अचानक लाईट गेल्याने प्रकाश नेमण हे जुन्या घराचा लाईटचा मीटर काढून ज्या दुसर्‍या जागी बसवलेला होता, त्या लाईटच्या बोर्डवरून नवीन घराच्या बोर्डमध्ये वायर टाकून लाईट घेत होते. याच दरम्यान गेलेली लाईट अचानक आली व प्रकाश नेमण यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या अपघाती दुर्दैवी मृत्यूने कुवे मावळतवाडीवर शोककळा पसरली आहे. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button