
रेड्डीज प्रयोगशाळेने ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन लसीची डिलिव्हरी सुरू केली एका डोसची किंमत ९९५.४० रुपये
कोरोना लढय़ात देशाला तिसरी लस मिळाली आहे. हैदराबादच्या डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने ‘स्पुटनिक व्ही’ या रशियन लसीची डिलिव्हरी सुरू केली आहे. शुक्रवारी प्रयोगशाळेतील कस्टम फार्मा सर्व्हिसेसचे ग्लोबल हेड दीपक सप्रा यांना पहिला डोस देण्यात आला. लसीच्या एका डोसची किंमत पाच टक्के जीएसटीसह हजाराच्या घरात म्हणजेच ९९५.४० रुपये असेल. डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेने ही माहिती दिली.
www.konkantoday.com