
रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता
गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गात वादळासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, ‘ऑरेंज अॅलर्ट’चाही इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com




