
फेम इंडिया मासिका-एशिया पोस्टनेनिवडलेल्या देशातील पन्नास लोकप्रिय पोलिस प्रमुखांच्या यादीत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची निवड
कायदा आणि सुव्यवस्था राखतानाचसामाजिक सलोखा राखण्यासाठी आणि लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणाऱ्या देशातील ५० लोकप्रिय पोलीस प्रमुखांची निवड फेम इंडिया मासिका-एशिया पोस्टने केली असून त्यामध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून अशा ३ अधिकाऱ्यांचीच या यादीत निवड झाली आहे.
रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांच्या कामाची दखल फेम इंडिया मासिका-एशिया पोस्टने घेतली असून त्यांच्या देशातील लोकप्रिय ‘जिल्हा पोलिस अधीक्षक २०२१’ च्या वार्षिक सर्वेक्षण ५० च्या यादीत डॉ गर्ग यांचे नाव आहे.
www.konkantday.com