
उद्या सकाळी राजापूर येथून चक्रीवादळ रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणार असा अदांज -जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ उद्या राजापूर आंबोळगड येथून सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करेल असा अंदाज आहे सागवे साखरीनाटे आदी भागातून हे वादळ पूर्णगड वरुन सायंकाळी चारपर्यंत रत्नागिरी शहर परिसरात येईल असा अंदाज आहे यानंतर जयगड आदी भागातून हे वादळ रात्री अकरा वाजेपर्यंत गुहागरपर्यंत व परवा पहाटे दापोली वरून ते पुढे जाईल असा अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली या दृष्टीने प्रशासन सज्ज असून या ज्या भागातून हे वादळ जाणार्या पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली असून लोकांना बाहेर पडण्यास बंदी असणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली मागच्या निसर्ग वादळाचा वाऱ्याचा वेग मोठा होता परंतु या वेळी पन्नास ते साठ वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे काही वेळापुरते सोसाट्याचा वारा वाहिला तरी त्याचा वेग नव्वद किलोमीटरपर्यंतच असेल राजापूर विभागाला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे कारण हे वादळ ज्या भागातून जवळून जाणार आहे त्यानंतर वाऱ्याचा वेग कमी होत जाणार आहे या वादळाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागाला सज्ज राहण्यास सांगितले आहे ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी समुद्रकिनाऱ्याला आल्या आहेत
तसेच ज्या भागातून हे वादळ जाणार्या त्या भागांतील काेव्हिड सेंटरसाठी जनरेटर देऊन पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे तसेच या वादळामुळे झाडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक भागांत कटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे वादळामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार लक्षात एमएसईबी व अन्य विभागांना दक्ष राहण्यास सांगितले आहे
www.konkantoday.com