
लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!”-काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी
काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. “लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?” असं म्हटलं आहे.
झिशान सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. झिशान यांनी आपल्या ट्विटरवर लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या चार पोस्टर्सचे फोटोही शेअर केले आहेत. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. “वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. येथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!” असं झिशान सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com



