राज्यात किमान २० ते २२ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोससाठी लस आवश्यक -आरोग्य मंत्री राजेश टोपे
राज्यात किमान २० ते २२ लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्याची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवरही उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने वस्तुस्थिती समजून घेत राज्याला जेवढय़ा डोसेसची आवश्यकता आहे ते तातडीने पुरवावेत. त्याचप्रमाणे परदेशातून लस आयात करण्यासाठी राज्यांत स्पर्धा होऊ नये यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार करावे, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली.
www.konkantoday.com