
राजापूर येथे इंटरनेट कंपनीच्या मॅनेजरकडे खंडणीची मागणी करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केले
राजापूर ग्रामीण भागात महानेट कंपनीचे इंटरनेट केबलचे काम करणाऱ्या दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरकडे शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एक लाखाची खंडणी मागितल्याची घटना ताजी असतानाच याच कंपनीच्या कामात अडथळा आणून याच प्रोजेक्ट मॅनेजरकडे खंडणीची मागणी करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी नाटे पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालायाने त्या चौघांनाही १५ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी दर्शन इंटरप्रायझेस आणि शिलिकॉन केअर या कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर लक्ष्मणराव दशरथ सूर्यवंशी (रा.खेर्डेवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार रूपेश सर्जेराव मोहिते (२६ रा. दळे, ता. राजापूर), पद्नाथ उर्फ पिंट्या विलास कोठारकर (३५ रा. धाऊलवल्ली, राजापूर), संतोष उर्फ बाबू सन्मुख तोडणकर (४४, रा. गावखडी, रत्नागिरी) व सर्जेराव नारायण मोहिते (५२ रा. दळे सडेवाडी, राजापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नाटे पाेलिसांनी दिली.
www.konkantoday.com