
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील मॅटर्निटी हॉस्पिटल च्या वरच्या मजल्या वर कोविड सेंटर, शिवसेना नगरसेविका शिल्पा सुर्वे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
रत्नागिरी साळवी स्टॉप येथील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे .भरवस्तीत असलेल्या या इमारतीत दुसर्या मजल्यावर मॅटर्निटी होम असताना देखील याच इमारतीत काेविड रूग्णालयाला परवानगी आरोग्य विभागाने व प्रशासनाने कशी काय दिली अशी आता विचारणा होत आहे .याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेविका सौ शिल्पा सुर्वे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सुर्वे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
लहान मुलांचे रुग्णालय असलेले बाल रुग्णालय हे कोविड सेंटर मध्ये रुपांतरीत केलेले असून त्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे का? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या निवेदनात म्हटले आहे की डॉ चौधरी रुग्णालय हे सध्या कोविड सेंटर म्हणून रूपांतर करण्यात आले असून या बाल रुग्णालयाच्या खालच्या डॉक्टर भोळे यांचे मंगल मॅटर्निटी हॉस्पिटल आहे .बाजूला रहिवासी इमारती आहेत .डॉक्टर भोळे यांच्याकडे गरोदर माता नवजात शिशु तपासणीसाठी येत असतात आणि या बाल रुग्णालय आहे त्या कोविड सेंटर मध्ये कोविड रुग्ण येत असतात .
या रुग्णालयाचा एकच जिना असून बाधित झालेले लोक व नातेवाईक याच मार्गाने ये-जा करत असतात .या इमारतीत कर्मचारी पतसंस्थचे कार्यालय आहे.आता नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटर मध्ये सध्या अंदाजे २५ ते ३० रुग्ण कोरोना वर उपचार घेत आहेत .परंतु त्याच संकुलामध्ये डॉक्टर भोळे यांचे मंगल मॅटर्निटी हॉस्पिटल असून येथे गरोदर स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय यांची सारखी ये-जा सुरू असते .
तसेच याच मजल्यावर बांधकाम विभागाची पतपेढी असून याच मार्गावरून कर्मचारी वर्गाची ये-जा चालू आहे .याच लक्ष्मी आर्केड मध्ये कोविड सेंटर चालू असल्याने या रुग्णांना घेऊन येणारे ॲम्बुलन्स तसेच समोरील अरिहंत नगर मधील रहिवासी आणि बाजूच्या पारस ई-स्क्वेअर मधील रहिवासी यांना या कोविड सेंटरमुळे कोरोना विषाणू चा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्याच प्रमाणे भोळे हॉस्पिटलमध्येही येताना गरोदर माता नवजात बालकांना कोविड ची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निवेदनात म्हटले आहे
त्यामुळे हे कोविड सेंटर दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी तेथील स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका सौ शिल्पा सुर्वे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.आता याबाबत प्रशासन नेमकी कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com