
रत्नागिरी भा.ज .पा.ने ५० रिक्षा चालकांना केले जीवनावश्यक वस्तूंचे शिधावाटप
लॉक डाऊनमुळे रिक्षा चालक खूप अडचणीत आले असून त्यांचे सर्व अर्थकारण रोजच्या कष्टाच्या कमाईवर विसंबून असणारा हा वर्ग, समाजाचा मित्र असणारा हा वर्ग लॉक डाऊनमुळे त्रस्त होता. त्याची दखल घेत रत्नसिंधू रिक्षा संघटनेच्या ५० रिक्षा चालकांना भा. ज. पा. ने शिधावाटप केले. रत्नसिंधू रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर यांच्या उपस्थितीत भा.ज.पा कार्यालयात रिक्षा वाहकांसाठी शिधा वाटप करण्यात आले. द.भा.ज.पा अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस बापू सुर्वे आदि यावेळी उपस्थित होते. प्रताप भाटकर यांनी संघटनेच्या वतीने भा.ज.पा अध्यक्ष यांना या कठीण प्रसंगात रिक्षा चालकांची आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद दिले तसेच रिक्षा चालकांच्या प्रश्नांबाबत संघटनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन प्रताप भाटकर यांनी केले.
www.konkantoday
com