नियम मोडून दाटवस्तीतील संकुलनात कोविड सेंटरला मान्यता देणाऱ्यांना निलंबित कराः समविचारीची मागणी
रत्नागिरीः शहरातील गजबजलेल्या बालरुग्णालयाचे रुपांतर कोविड सेंटर म्हणून होताच याबाबत त्या परिसरातील नागरिकांनी लागलीच सबंधितांना कळवूनही दखल घेण्यात आली नाही.उलट नागरिकांच्या नाकावर टिच्चून हे सेंटर सुरुच राहीले.आजूबाजूची परिस्थिती पहाता एका सामुदायिक संकुलात हे सेंटर सुरु करायला परवानगी दिली कुणी ? यामध्ये नियम धाब्यावर बसवून इतरत्र खाक्या दाखविणा-या सबंधितांना निलंबित करा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
जिथे ही परवानगी देण्यात आलीय ते संकुल आहे.शिवाय आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे.कोविड सेंटर देताना जे निकष आहेत त्यात हे बसत नाही अशी तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांची तक्रार आहे.ही तक्रार तेथील नागरिकांनी सबंधितांपुढे मांडूनही सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचे जनतेचे म्हणणे आहे.म्हणून या प्रकाराला नियम मोडून खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा असेही समविचारीने म्हटले आहे.
कोविड सेंटरची नितांत जरुरी आहे.म्हणून भरवस्तीत निवासी वाणिज्य संकुलनात अशी सेंटर उभारणे म्हणजे इतरांचे आरोग्य धोक्यात आणणे होय तेव्हा हे सेंटर मान्यता रद्द करावी वा अन्यत्र हलवावे असे समविचारीने म्हटले आहे.
याच रुग्णालयात जाण्यायेण्याचा जिना हा सामायिक आहे.तिथेच नामवंत मँटर्निटी रुग्णालय फार जुने असलेले आहे.परवानगी देताना किमान प्रसुती दाखल महिला,गरोदर माता,नवजात शिशु यांच्या विषयी जाणूनबुजून वा हेतूपुरस्कर दुर्लक्ष करण्यात आले की कसे ? केवळ या एका गोष्टीमुळे हे कोविड सेंटर नाकारले जात असताना मान्यता देण्याचा अट्टाहास कुणी आणि कशापायी केला हे बाहेर यायला हवे अशी मागणी समविचारीचे सर्वस्वी माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये,या प्रभागातील लढवय्ये कार्यकर्ते आणि समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी,रघुनंदन भडेकर,निलेश आखाडे,महिलाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी,संघटक सुप्रिया सुर्वे,आदींनी केली आहे.
स्वतंत्र इमारतीतील सुसज्ज स्वतंत्र स्थानिक वैद्यकीय कोविड रुग्णालय केवळ तोंडी तक्रारी वरुन बंद करायला निघालेले मंत्री आणि आरोग्य यंत्रणेच्या सुभेदारांना शहरातील भरवस्तीत सुरु असलेले ‘निर्मल’ कोविड रुग्णालय आणि त्या रुग्णालयाला दिलेली मान्यता दिसत नाही का ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र समविचारी मंचने प्रशासनाला केला आहे.याबाबतचे सत्य बाहेर यायला हवे.कोविड रुग्णालय हवी आहेत पण कुणाचे आरोग्य धोक्यात आणून नको असेही समविचारीने मत व्यक्तविले आहे.
www.konkantoday.com