चिपळूणमधील कॉग्रेसच्या गटबाजीवर मनोज शिंदे लवकरच बेठक घेणार -सूत्रांची माहिती
चिपळूण मधील कॉग्रेस मधील गटबाजीच्या तक्रारी प्रदेशाद्यक्स नाना पटोले यांच्याकडे गेल्या असून यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना रत्नागिरी जिल्हा कॉग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांना करण्यात आल्या आहेत त्यामुळे मनोज शिंदे लवकरच जिल्ह्यात मोठी सभा घेऊन वादावर तोडगा काढणार आहेत पण पक्षात राहून गटबाजी करण्यावर मनोज शिंदे आपल्या स्टाईलने कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत अशी
माहिती सूत्रांकडून मिळत आहे .
सध्या चिपळूणच्या कॉग्रेस धुमशन सुरू झाले आहे एकीकडे कोरोना असूनसुद्धा कॉग्रेस मध्ये गटबाजीचे राजकारण तापले आहे सोशल मीडिया असो वृत्तपत्र असून त्यामाध्यमातून आरोप प्रत्योरोप सुरू आहे तर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर एकमेकांविरोधात तक्रारी सुद्धा करण्यात आल्या आहेत याबाबत प्रदेशादयक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रारी गेल्या आहेत आणि त्यांनी रत्नागिरी जिल्हा कॉग्रेस प्रभारी मनोज शिंदे यांना या विषयाकडे लक्ष केंद्रित करावे आशा सूचना केल्या आहेत
त्यानुसार मनोज शिंदे हे लवकरच जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाची सभा घेणार आहेत त्याचबरोबर चिपळूण मधील कॉग्रेस गटबाजीवर बेठक घेणार आहेत तसेच गटबाजी करणाऱ्यावर आपल्या शिंदे शाही स्टाईलने कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत असे सूत्रांकडून बोलले जात आहे त्यामुळे सदरची बेठक नेमकी कधी होणार याविषयी शिंदे यांना दूरध्वनी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल होते मात्र याविषयी लवकरच बेठक होणार असल्याचे सूत्रांकडून समजते .
www.konkantoday.com