खेड तालुक्यातील वावे तर्फ नातू धनगरवाडीला तातडीने पाणी टॅंकर पुरवण्याची मागणी
खेड तालुक्यातील वावे तर्फ नातू धनगरवाडीला सध्या पाण्याची भिषण टंचाई असून स्थानिकग्रामपंचायती कडून शासकीय पाणी टॅंकर मांगणीचा प्रस्ताव आपल्या कार्यायात पाठविण्यात आला आहे.आज तारखेला वावे तर्फ नातू धनगरवाडीवर पाणी नसल्याने वयोवृध्द नागरीक तसेच जनावरे पाण्यासाठी तडफडत आहेत
लाॅकडाऊन मुळे स्थानिक ग्रामस्थ पाठपुरावा साठी आपल्या कार्यालयात येऊ शकत नाहीत तरी वरील सर्व अडचणींचा विचार करून तातडीने वावे तर्फ नातू धनगरवाडीला शासकीय पाणी टॅंकर पाठवून सहकार्य करावे अशी मागणी महाराणी अहिल्यादेवी समाजप्रबोधन मंच,रत्नागिरीचे अध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी गटविकास अधिकारी खेड पंचायत समिती यांच्याकडे केली आहे
www.konkantoday.com