सावधगिरी म्हणून कोकण किनारपट्टी भागातील मच्छीमारांना परत येण्याच्या सुचना
काही दिवसांपासून कोकण किनारी भगात अवकाळी पावसाने तडाखा दिल्यानंतर आता येत्या चार दिवसांत अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. हे चक्रीवादळ १५ मे रोजीच्या आसपास घोगावण्याची शक्यता असली तरी ते १४ मे रोजी दक्षिणेकडे सरकण्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. मात्र, सावधगिरी म्हणून कोकण किनारपट्टी भागातील मच्छीमारांना परत येण्याच्या देण्यात आल्या असून प्रशासनाने किनारी भागात हाय अॅलर्ट जारी केला आहे.
यामुळे हवामान खात्याकडून अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
www.konkantoday.com