
संगमेश्वर तालुक्यातील घोडवली येथे रिक्षा उलटून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील घोडवली फाटा येथे बुधवारी सकाळी ८.४५ वा. रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. यामध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी आहेत. गणपत रामा म्हादे (६०, पांगरी धारेखालची वाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
देवरुख पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संदीप गावडे ( पांगरी धारेखालची वाडी) हे आपल्या रिक्षातून म्हादे यांना घेऊन तुळसणी येथील दवाखान्यात गेले होते. उपचारानंतर घरी परतत असताना घोडवली फाटा येथे समोरून येणाऱ्या डंपरला साईट देताना रिक्षाला अपघात झाला. रिक्षा चालक संदीप गावडे व दताराम गावडे हे जखमी आहेत.
www.konkantoday.com