जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका-शिवसेनेची केंद्रावर टीका
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने आधी इंधन दरकपातीचा ‘चमत्कार’ आणि निवडणुकीनंतर दरवाढीचा ‘नमस्कार’ जनतेला पुन्हा अनुभवायला मिळत आहे. पाच राज्यांतील निवडणुकांचा धुरळा खाली बसला आणि पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला. ज्यांच्याकडे थोडेफार आहे ते पेट्रोल-डिझेलला शंभरी पार करून काढून घ्यायचे आहे का? जनतेच्या खिशात काही टाकता येत नसेल तर निदान जे काही शिल्लक आहे, ते काढून तरी घेऊ नका, असा सल्ला शिवसेनेनं केंद्र सरकारला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात इंधन दरवाढ आणि निवडणुकांवर भाष्य करण्यात आले आहे.
www.konkantoday.com