टोकन पद्धतीचा अवलंब करून लसीकरण मोहीम राबविण्यात यावी-शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक उमेश सकपाळ
ऑनलाइन लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होत असून, त्या तुलनेत लसींचे डोस उपलब्ध होत नाहीत. कोकणसारख्या ग्रामीण भागात लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अडचणीचे आहे. त्यातच ऑनलाइन लसीकरणात गोंधळ होत आहे. यामुळे पूर्वीप्रमाणेच टोकन पद्धतीचा अवलंब करून लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक उमेश सकपाळ यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शहरासह ग्रामीण भागातील लोकांना टोकन पद्धतीने सुरू असणारे लसीकरण सोयीचे ठरत होते. आता १८ ते वयोगटातील लोकांसाठी ऑनलाइन लसीकरण सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. ऑनलाइन नाेंदणी करूनही लस मिळत नाही.
www.konkantoday.com