
चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेतून पडलेल्या तरूणाचा मृत्यू.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेतून पडलेल्या ३० वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.संतोष सिताराम उरॉव (३०, झारखंड) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. संतोष उरॉव हा कोईमतूर फेअरवेल या धावत्या रेल्वेतून प्रवास करत असताना तो रेल्वेगाडीतून पडला होता. यावेळी त्याला उपचारासाठी कामाथे रूग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.www.konkantoday.com