
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे.संबंधित विभागातर्फे सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर तात्पुरते तपासणी नाके देखील उभारण्यात आले आहेत.यासंदर्भात उत्पादन शुल्क खात्याने प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, १ मार्चपासून आतापर्यंत गोवा राज्यातील अवैध मद्य वाहतूक किंवा विक्री प्रकरणी महाराष्ट्र दारुबंदी कायद्यानुसार एकूण २१ गुन्हे नोंदविले आहेत. तसेच पाच वाहनांसह २० लाख ३२ हजार ८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण २२ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयित वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गोवा राज्यातून चोरट्या मार्गाने येणाऱ्या मद्यावर कटाक्षाने पाळत ठेवून कठोर कारवाई करण्याबाबत विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे.www.konkantoday.com