सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस विभागातील तब्बल ४१पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस विभागातील तब्बल ४१पोलिस कर्मचार्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पदोन्नती दिली आहे. या पदोन्नतीसोबतच या सर्वांना सातव्या वेतन आयोगांतर्गत लाभही देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १४ हवालदारांना सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून, १६ पोलिस नाईक यांना हवालदार म्हणून तर १७ पोलिस शिपायांना पोलिस नाईक म्हणून बढती देण्यात आली आहे.
www.konkantoday.com