
तटरक्षकदलाच्या ताफ्यामध्ये आयसीजीएस सी-452 ही बोट सामिल
भारतीय जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरीत्या बेकायदेशीर कामांना रोख लावण्यासाठी तटरक्षक
दलाच्या ताफ्यामध्ये आयसीजीएस सी-452 ही बोट सामिल झाली आहे. तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अवर महानिर्देशक राजन बड़गोत्रा, पीटीएम, टीएम यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बोटीचे काल तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्या उपस्थितीत जयगड (रत्नागिरी) येथे अनावरण करण्यात आले. ही बोट जयगड येथे तैनात राहणार आहे.
www.konkantoday.com