
आसनसोलमधून अभिनेते व ‘तृणमूल’चे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा विजयी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्चस्वाला आव्हान देत २०२४ च्या लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व कायम राखल्याचं पाहायला मिळालं.राज्यात तृणमूल काँग्रेसनं सर्वाधिक २९ जागा जिंकल्या. त्यांच्या जागांमध्ये २०१९ च्या तुलनेत सात जागांची भरच पडली. आसनसोलमधून अभिनेते व ‘तृणमूल’चे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा विजयी झाले. शत्रुघ्न सिन्हा यांच्या विजयानंतर त्यांची लेक सोनाक्षी सिन्हा हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.वडिलांच्या विजयानंतर सोनाक्षीनं सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला. इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत तिनं आसनसोलच्या जनतेचे आभार मानले आहेत. तर दुसऱ्या एका स्टोरीत तिनं शत्रुघ्न सिन्हा यांचा एक फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्यात.www.konkantoday.com