
महाराष्ट्र राज्याचा 66 वा स्थापना दिन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी ध्वजवंदन
रत्नागिरी, दि. 29 : महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे पालकमंत्री डॉ. उदय स्वरुपा रविंद्र सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे. तरी या प्रसंगी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे.
राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.000