मी तुमच्या पाया पडतो.. चांगले डॉक्टर, चांगली आरोग्य सेवा आंम्हाला द्या, सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांचे राजेश टोपे यांना साकडे
मी तुमच्या पाया पडतो, पण महाराष्ट्राला रेमडीसीवर व ऑक्सीजनचा पुरवठा करा’ अशी केंद्राकडे साद घालणाऱ्या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना लांजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी देखील अशीच साद घातली आहे. रत्नागिरी जिल्हयात गेल्या कित्येक वर्षात कोणतीच आरोग्य सेवासेवा सुविधा उपलब्ध न झाल्याने कोरोना संकटात जिल्हयात अनेकांचे उपचाराअभावी बळी जात आहेत. त्यामुळे मी तुमच्या पाया पडतो.. चांगले डॉक्टर, चांगली आरोग्य सेवा आंम्हाला द्या, कोरोना काळात ऑक्सीजन, रेमडीसीवर आणि ऑक्सीजन बेडचा पुरवठा करा आणि रत्नागिरी जिल्हयाला वाचवा अशी साद त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना घातली आहे
www.konkantoday.com