कुभार्ली घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात येणार्‍या कडून बनावट ई पासचा वापर, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनानेलॉक डाऊन जाहीर केले होते. या लॉक डाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते याचाच एकभाग म्हणुन दि. २३/०४/२०२१ रोजी पासुन आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पास सेवा नागरिकांसाठी उपलब्धकरुन देण्यात आली होती. परंतु सदर ई पास सुविधेचा काही लोकांनी गैरफायदा घेतल्याचे निदर्शनासआले आहे. त्यामुळे अशा लोकांवर रत्नागिरी जिल्हामध्ये ०२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.दि. १०/०५/२०२१ रोजी अलोरे पोलीस ठाणे हहित कुंभार्ली चेक पोस्ट येथेपोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर व अलोरे पोलीस ठाण्याचे स.पो.फी. विजय केतकर, पो.हवा. स्वप्निल साळवी,होमगार्ड यशवंत धांगडे, आदित्य कुळे, आरोग्य सेवक श्री.मोहिरे, शिक्षक दत्ताराम निर्मल, विलास मायनाकअसे रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना कराड बाजुकडुनरत्नागिरी जिल्ह्यात येणारी इर्टिका गाडीस तपासणी करीता थांबवुन, गाडीतील व्यक्तीकडे ई पासची मागणीकरुन पासवरील क्युआर कोड स्कॅन केला असता, तो पास बनावट असल्याचा संशय आला. म्हणुन सदरप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतली असता तो पास बनावट असल्याचेनिष्पन्न झाले. सदर बाबत सावर्डे पोलीस ठाणे येथील नेमणुकी व कुंभार्ली चेक पोस्ट येथे डयुटीस कार्यरतअसलेल्या पोउनि श्रीमती धनश्री विष्णु करंजर यांचे दिलेल्या तक्रारीवरुन अलोरे पोलीस ठाणे गु.नो.क्र.२/२०२१, कलम ४२०,४६८,४७१,२६९.३४ भा.दं.वि प्रमाणे गाडीचा चालक (१) पुष्पक नरसिंग शिंदे, वय २४वर्षे, रा. नांदीवसे, राधानगर, ता. चिपळुण, सध्या रा. खेडी, दत्तवाडी, ता. चिपळुण तसेच गाडीचे मालक
(२) रोशन सुरेश शिंदे, रा.कळवणे व सहचालक (३) रेवण दत्तात्रय अडसुळ, वय २३ वर्षे रा. दादर,
गावठाण, ता.चिपळुण यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयांचे अनुषंगाने केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, यातील वाहनमालक रोशन सुरेश शिंदे यांनी गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीची माहिती व कागदपत्रे गाडीतीलसहचालक रेवण अडसुळ यांना मोबाईलवर पाठवुन रेवण अडसुळ यांनी ई पाससाठी त्यांचेकडे असलेल्याएका मोबाईल नंबरवर सदरची माहिती पाठवुन ई पास तयार केला आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनिसंदीप पाटील हे करीत आहेत.
या पार्श्वभुमीवर असे आवाहन करण्यात येते की, ई पाससाठी अर्ज करताना गरजुनागरिकांनी कायदेशिर मार्गाचा अवलंब करावा. कोणत्याही अविश्वासु व्यक्तिची मदत घेऊ नये. पासकाढण्यासाठी प्रशासनाकडुन कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button