ऑनलाइनमुळे ग्रामीण भागातील लोकांना अडचणी,गावपातळीवर बूथ लावून लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्या-सुहास खंडागळे
रत्नागिरी:- ऑनलाईन नोंदणी व लसीकरण बाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, गाव पातळीवर त्या भागाला एखादा वार ठरवून देऊन त्या गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात गावातल्या गावात बूथ लावून लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी ईमेलद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र येथे ऑनलाईन नोंदणीची अट शिथिल करावी असेही सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये खंडागळे यांनी म्हटले आहे की,जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन करत असलेले प्रयत्न ही दिलासा देणारी बाब आहे.
मात्र ,ग्रामीण भागात नागरिकांमध्ये लसीकरण बाबत गोंधळ आहे. ऑनलाइन नोंदणी बाबत माहिती नसणे, इंटरनेटची सुविधा नसणे यामुळे लसीकरण केंद्र जवळपास असूनही त्याचा लाभ त्या भागातील लोकांना होत नाही.अनेक दुर्गम भागात लसीकरण केंद्र आहेत मात्र त्या केंद्रावर लस घेण्यास येणार वर्ग हा शहरी आहे,किंवा अन्य भागातील आहे याकडे सुहास खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे. ग्रामीण भागातील, मजूर,शेतकरी व अशिक्षित लोकांना या लसीकरणाचा फायदा होत नाही,आजही ग्रामीण भागातील मोठा वर्ग जो 45 वर्ष वयोगटा वरील आहे तो लसीकरण पासून वंचित आहे.काही ठिकाणी दुर्गम भागात लसीकरण साठी पाठवलेले डोस हे नोंदणी नसल्याने शिल्लक राहत आहेत याकडे सुद्धा सुहास खंडागळे यांनी लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागात ,खेड्यापाड्यात, गाव पातळीवर त्या भागाला एखादा वार ठरवून देऊन त्या गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात गावातल्या गावात लसीकरण बूथ लावून करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये केली आहे.
ग्रामीण भागात वैद्यकीय सुविधांचा अभाव असतो,त्यामुळे या भागात रुग्णवाढ होणे धोक्याचे आहे.परिणामी साथीचा फैलाव ग्रामीण भागात होऊ नये,यासाठी गावखेड्यात बूथ लावून लसीकरण मोहीम हाती घ्यावी,त्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सोबत ग्राम कृती दलाची मदत घ्यावी अशी मागणीही खंडागळे यांनी या ईमेल मध्ये केली आहे.
www.konkantoday.com