
वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी रामगडे, तर असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत जाधव
गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद दोन गटांतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी आज गुहागर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे गुहागर तालुक्यातील पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती गणाच्या इछुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
यामध्ये वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिद्धी संतोष रामगडे, असगोली जिल्हा परिषद गटातून विक्रांत भास्करराव जाधव यांची उमेदवारी आज आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर केली. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत आनंदोत्सव साजरा केला.




