
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज रात्री बारा वाजल्यापासून पंधरा तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय ,वेळ आल्यास रत्नागिरी जिल्ह्यातही हा निर्णय लागू होणार – उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने आज (९)रात्री बारा वाजल्यापासून पंधरा तारखेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या वेळी ज्याप्रमाणे अतिशय कडक लाॅकडाऊन केले होते तसे कडक लाॅकडाॅऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज ऑनलाइन पत्रकार परिषदेत बोलताना दिली हा लाॅक डाऊन अतिशय कडक असणार असून त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, आंबा वाहतूक , लसीकरण व अन्य महत्त्वाच्या बाबीसाठी फक्त सूट देण्यात येणार असून बाकी सर्व व्यवहार पूर्णपणे बंद राहणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातही कराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येत्या दोन तीन दिवसांत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिलजी परब यांच्याशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातही कडक लॉक डाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com