लोटेतील सुप्रिया कंपनीचे दोन अद्यावत कोविड सेंटर सोमवारपासून होणार सुरू
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता ती आटोक्यात येण्यासाठी लोटे एम आय डी मधील सुप्रिया लाइफसन्स कंपनीचे सोमवार दि १०मेला लोटे मध्ये दोन अद्यावत कोविड सेंटर सुरू करत आहे त्याचा फायदा लोटे एमआयडीसी व परिसरातील गावांना होऊ शकतो अशी माहिती कंपनीचे मालक सतीश वाघ यांनी दिली कोविड सेंटरसाठी सतीश वाघ यांनी ५० लाखाचे अनुदान दिले आहे त्यामुळे प्रशासनकडून कोतुक होत आहे .
कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून ती आटोक्यात आणण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत आणि प्रशासनला साथ देत आहेत त्यातच नव्याने लोटे एम आय डी सी मधील सुप्रीया लाइफसन्स कंपनीने पाऊल उचलले आहे खेड मध्ये एक नव्हे तर दोन अद्यावत कोविड सेंटर सुरू होत आहेत
यामध्ये एसएमएस हॉटेल वक्रतुंड येथे व्हेंटिलेटरसह सुसज्ज ३० आयसीयु बेड व मेसम परशुराम हॉस्पिटल ऑक्सिजन पुरवठा असलेल्या ३० बेड घाणेखुंट लोटे येथे सोमवार दि १० मे पासून सुरू होत आहे
www.konkantoday.com