मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अँप तयार करण्याची परवानगी मागितली
लसीकरण अँपवर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचं चित्र आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यास अडचणी आहेत. करोना लसीकरणासाठी तयार करण्या अँपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अँप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अँपमध्ये अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.
www.konkantoday.com