
इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत मनसेने छेडले बैलगाडीवरून अनोखे आंदोलन
सध्या डिझेल व पेट्रोलच्या किंमती दररोज वाढत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला असून कच्च्या तेलाचे दर स्थिर असताना देखील इंधन दरवाढीचे कोणतेही सबळ कारण न देता इंधनाचे दर वाढत असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा मनसेच्यावतीने अनोखे बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी पेट्रोल पंपासमोर बैलगाडी उभी करून त्यावर जाहीर निषेध करणारी पोस्टर लावून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. अत्यावश्यक इंधनाचे वाढवलेले दर तात्काळ कमी करावेत व जनतेची हेळसांड थांबवावी अशी मागणी यावेळी मनसेच्यावतीने करण्यात आली व तसे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, रितेश सावंत आदी कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरून येवून अनोखे आंदोलन केले.
www.konkantoday.com