
कोरोना रुग्णांना म. फुले जनआरोग्य योजनेचा लाभ न देणार्या रुग्णालयांना नोटिसा
रत्नागिरी- कोरोनाबाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांना या योजनेच्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येमध्ये बेडस मिळणार असल्याने दिलासा मिळणार आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करावेत, असे स्पष्ट आदेश शासनाकडून खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्णांलयांकडून अर्जांवर स्वाक्षर्याही घेण्यात आल्या. या रुग्णालयांमध्ये जागा नसणे, रुग्णाला दाखल करून न घेणे याबाबतच्या तक्रारी नातेवाइकांनी केल्या होत्या. त्यानंतर वृत्तपत्र, समाजमाध्यमांवर बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याची दखल जनआरोग्य योजनेने घेतली आहे.
या नोटिसांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यामुळे आता या योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांना कोरोना रुग्ण घेणे भाग पडेल. अन्यथा रुग्ण योजनेकडे तक्रार करू शकतो. यासाठी टोल फ्री क्रमांक 18002332200 यावर अथवा योजनेचे आरोग्यमित्र यांच्याकडे तक्रार करू शकतात.
या नोटीसांमध्ये म्हटले आहे की, लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार मिळाल्याबद्दल आपले रुग्णालय आमच्याकडे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (एमजेपीजेवाय) अंतर्गत दिले आहे. परंतु सामंजस्य कराराच्या काही अटींचे उल्लंघन झाले आहे. वृत्तपत्र आणि समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या लेखानुसार आपले रुग्णालय पात्र एमजेपीजेवाय लाभार्थी असूनही योजनेअंतर्गत कोविड 1 रूग्णांना प्रवेश नाकारत आहे. आपले रुग्णालय क्रिटिकल केअर आणि पल्मोनोलॉजीसाठी बनविले गेले आहे. कोविड 1 पासून पीडित एमजेपीजेवाय लाभार्थी कॅशलेस उपचार घेऊ शकतात. मात्र निवडक लाभार्थ्यांना उपचार केले जात आहेत. लाभार्थी आणि कोविड 1 पासून पीडित सर्व पात्र एमजेपीजेवाय लाभार्थ्यांना कॅशलेस उपचार देत नाहीत. कलम 3.3, 1.1, 2.2, आणि 4.4, 1.1, 2.2 चे थेट उल्लंघन आहे, असे नोटीसीत म्हटले आहे.
www.konkantoday.com