
आपण जे पत्रकार परिषदेत बोललो नाही त्याचे चुकिचे वृत्त करून टीका करणार्या स्वयंघोषित पत्रकार पुढाऱ्यांचा आपण जाहीर निषेध करतो, हा पत्रकारितेचा अपमान आहे, नामदार उदय सामंत यांची माजी आमदार बाळ माने यांच्यावर जोरदार टीका
आपण राजापूर किंवा अन्य कुठल्याही पत्रकार परिषदेत ४५वर्षांवरील नागरिकांची लसिकरणाची आपली जबाबदारी नाही असे कुठलेही वक्तव्य केले नसतानादेखील मी न केलेल्या वक्तव्याच्या बातम्या करून त्यावर टीका करणार्या या नवीन स्वयंघोषित पत्रकार पुढार्याचा आपण जाहीर निषेध करतो अशा शब्दांत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माजी आमदार बाळ माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे
४५वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाच्या बातमीवरून माजीआमदार बाळ माने यांनी सामंत यांच्यावर टीका केली होती त्याला सामंत यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे
कधी न बोलणारे आता फोटोवरून टीका करीत आहेत पण अशा लोकांनी आधी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे आम्हाला बेजबाबदार म्हणताना ते जबाबदारीने वागत असल्याचे दिसत नाही आता हे नवीन स्वयंघोषित पत्रकार पुढारी आमच्यावर टीका करीत आहेत मला महाराष्ट्रातील ,रत्नागिरी जिल्ह्यातील, व तालुक्यातील जनता चांगलीच ओळखते म्हणूनच त्यांनी मला एवढे वेळा निवडून दिले आहे एवढेच नव्हे तर दरवेळी विजयी होण्याचा फरक नव्वद हजारांपर्यंत गेला आहे आम्ही विरोधक असले तरी त्याच्या चांगल्या सूचनांचे स्वागत करतो मानेनी आमच्यावर टीका केली असली तरी त्यांनी सुचवल्याप्रमाणे यश फाऊंडेशनच्या नर्सिंगच्या मुली आम्ही महिला रूग्णालयात सामावून घेतल्या त्यांनी केलेल्या टीकेची दखल कोणीच घेत नाही उलट दीपक पटवर्धन यांचे टीकेची दखल घेतली जाते माने हे माझ्या पेक्षा राजकारणात शिक्षणात सीनियर आहेत पण मंत्री व्हायला देखिल नशीब लागते ते माझ्या नशिबात होते याचा त्यांना अनुभव आहेच पण चुका नसतानादेखील बातम्या करणे चुकीचे आहे जे काही राजकारण करायचे आहे ते निवडणुकीत करणे योग्य आहे पण त्याचा देखील किती उपयोग झाला हे सर्वांना दिसले आहे अशाने संघटना वाढणार नाही ज्यांना कुणाला माझा अनादर करून किंवा माझी बदनामी करून शांत झोप लागत असेल तर माझे काही म्हणणे नाही तरीदेखील त्यांनी घातलेल्या शिव्या या माझ्यासाठी ओव्या असतील मी समोरच्या कार्यकर्त्यांचे देखील कौतुक करतो मी माझी स्वत: ची अँम्ब्युलन्स सिव्हिल हॉस्पिटलसाठी दिली आहे काहीना ऊठसूट उदय सामंत वर टीका केल्याशिवाय चालत नाही
माहिती कार्यालयाला नवीन कॅमेरे मिळाला त्याचा शुभारंभ पत्रकार परिषदेत झाला त्या वेळी खासदार विनायक राऊत व जिल्हाधिकाऱ्यांचा फोटो काढण्याचा पत्रकारांनी आग्रह केला म्हणून काढला ताे देखील सुरक्षित अंतर ठेवून परंतु उगाचच टीका करायची म्हणून टीका केली जाते त्यांनी माझ्यापेक्षा अनेक पावसाळे बघितले आहेत तरीदेखील त्यांच्यावर ही वेळ आली आहे तशी वेळ माझ्यावर येऊ नये माजी आमदार विनय नातू व बाळ माने यांच्या व भाजपा नेत्यांच्या चांगल्या सूचनांचे आपण स्वागत केले आहे ही राजकारण करण्याची वेळ नाही यामुळे आता यापुढे त्यांच्या कुठल्याही टीकेची दखल घेतली जाणार नाही सामंत यांनी सांगितले तसेच न बोललेल्या वक्तव्याची बातमी करू नयेत यासाठी त्यांना चांगली लस द्यावी असाही टोला सामंत यांनी शेवटी हाणला
www.konkantoday.com