
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देताना वय, सहव्याधीनुसार टप्पे करण्याचा विचार -आरोग्य मंत्री राजेश टोपे
लसींचा तुटवडा आणि लसीकरण केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देताना वय, सहव्याधीनुसार टप्पे करण्याचा विचार सार्वजनिक आरोग्य विभाग करीत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत ही माहिती दिली.
३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला वर्गीकरण करावे लागणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.
www.konkantoday.com