
रत्नागिरी शहरातील स्वस्तिक हॉस्पिटल मध्ये कोविड केअर सेंटर – उदय सामंत
रत्नागिरी शहरातील डॉक्टर नितीन चव्हाण यांनी रत्नागिरी शहरातील त्यांचे स्वस्तिक हॉस्पिटल कोविड केअर सेंटरसाठी जिल्हा प्रशासनाकडे दिले असून त्या ठिकाणी 45 बेडची क्षमता आहे. हे कोविड केअर सेंटर आपण लवकरच सुरू करत आहोत. जिल्हा क्रीडा संकुल येथे महिलांसाठी कोविड सेंटर सुरू होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com