मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी दिलेली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट लॅब चिपळूण येथे
रत्नागिरी जिल्ह्यात कोविडचे वाढते प्रमाण लक्षात घेता कोविड तपासणीला अधिक वेग यावा यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यासाठी मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट लॅब दिली आहे.या मोबाईल लॅबमधून दिवसाला दोन हजार चाचण्या करता येणार असून ही मोबाईल लॅब चिपळूण येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
www.konkantoday.com