
चिपळूण तालुक्यात आत्महत्येच्या दोन घटना
चुलत्याने मारल्याच्या रागातून चिपळूण तालुक्यातील पेढांबे येथील ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे, तर दहिवली येथे २८ वर्षीय तरुणाने मानसिक आजारातून आत्महत्या केली़ या दाेन्ही घटना बुधवारी घडल्या
सूरज सदानंद शिंदे (३०, रा़ पेढांबे-दाभाडेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याची खबर सदानंद सखाराम शिंदे (५८, रा़ पेढांबे – दाभाडेवाडी) यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत दहिवली बुद्रुक निमेवाडी येथील अमोल हेमकिरण घाग (२८) हा मानसिक आजारी असल्याने त्याने बुधवारी सकाळी ७.३० ते ८.४५ च्या कालावधीत कातळाचे शेत येथे गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची हेमकिरण गोंविद घाग (६४, रा़ दहिवली बुद्रुक निमेवाडी) यांनी सावर्डे पोलीस स्थानकात नोंद केली आहे.
www.konkantoday.com