असे विद्वान जोपर्यंत कोकणात निवडून येतील तोपर्यंत कोकणी लोकांचं काही खरं नाही -माजी खासदार निलेश राणे यांची टिका

कोकणाचे आमदार म्हणतायत मोठ्या हॉस्पिटलची कोकणात गरज नाही. असे विद्वान जोपर्यंत कोकणात निवडून येतील तोपर्यंत कोकणी लोकांचं काही खरं नाही. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांवर आमदारांना घाम फुटला कारण कधी काही केलंच नाही, काम केलं असतं तर चोख उत्तर देऊ शकले असते. असं म्हणतानाच एक व्हिडीओ व्हायरल करत भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी कोकणातील शिवसेनेच्या आमदारांना
लक्ष केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मात्र कोकणातल्या राष्ट्रवादी काँग्रेस-सेनेचे आमदार, खासदार जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे.
पत्रकार परिषदेत पत्रकारानी आरोग्य सुविधावर विचारलेल्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस-सेनेचे आमदार यांच्यात तू तू…मैं मैं करत बोलती बंद झाली. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघात तर आरोग्याच्या सोयीसुविधा अभावी आजारी पडलेले असतानाच कोरोना रुग्णांचे मृतदेह नेण्यासाठी शहवाहिनी देखील नसल्याचे समोर आले आहेत. ठाकरेंचे गुणगान गाणारे जाधव मतदार संघासाठी कधी काम करणार असा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातुन उमटत आहे असे राणे यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button