रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य विभागामार्फत RT-PCR किंवा अँटीजेन चाचणी करण्याची सोय उपलब्ध, ‘मोबाईल व्हॅन’ द्वारे होणार तपासणी
सध्या रत्नागिरी शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून टेस्टींग, ट्रेसिंग व ट्रिटमेंट (3T)या त्रिसुत्रीचा अवलंब केल्यास रुग्ण संख्या नियंत्रात येऊ शकते. तरी प्रत्येक नागरीकांना संशयीत लक्षणे आढळून आल्यास तसेच पॉझिटीव्ह रुग्णाच्या सानिध्यात आल्यास अथवा पुणे, मुंबई व अन्य जिल्हयातून प्रवास करुन आल्यास RT-PCR किंव्हा अँटीजेन चाचणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य विभागामार्फत वरील दोन्ही चाचण्या करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तिंना चाचणी करावयाची आहे अशांनी जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्ष टोल फ्रि क्रमांक १०७७ किंव्हा ०२३५२ २२२२३३,२२६२४८ या दुरध्वनी क्रमांकावर दररोज सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत संपर्क साधावा, जेणे करुन सदर मोबाईल व्हॅन आपल्या ठिकाणी वेळेत पोहचेल.असे आवाहन तालुका आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे
www.konkantoday.com