
परिवहनमंत्री अनिल परब यांची निसर्गरम्य दापोली तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जागा, लवकरच याचा गौप्यस्फोट करणार -भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी निसर्गरम्य दापोलीतालुक्यात कोट्यवधी रुपयांची जागा घेतली आहे. माहिती अधिकार कायद्यान्वये आपण याबाबतची माहिती मिळविली असून, लवकरच याचा गौप्यस्फोट करणार, अशी माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दापोली उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसी सेंटर व दापोलीतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमय्या दापोलीच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकरांच्या नावाने दापोली तालुक्यात दोन मालमत्ता असून या सगळ्यांची कागदोपत्री माहिती घेण्यासाठी दापोली येथे आल्याचे सोमय्यानी सांगितले.
www.konkantoday.com