नरेंद्र मोदींनी भेट दिली असती तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला असता -खासदार विनायक राऊत
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप – प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आता शिवसेना सचिव आणि रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत हा सारा मुद्दा आता नरेंद्र मोदींच्या कोर्टात नेऊन ठेवला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट मागत होतो. खासदार छत्रपती संभाजी राजे देखील त्यासाठी प्रयत्नशील होते.
त्यांनी देखील भेट मागितली होती. पण, नरेंद्र मोदी यांनी मात्र काही भेट दिली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींनी भेट दिली असती तर मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटला असता अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
www.konkantoday.com