जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे ४ बॉम्ब दापोली पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतले
दापोली तालुक्यातील साकुर्डे येथील शिकारीसाठी गेलेल्या विनोद बैकर याचा मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले असून जंगली श्वापदांची शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारे ४ बॉम्ब दापोली पोलिसांनी संशयितांकडून ताब्यात घेतले आहेत. हे बाॅम्ब न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात आल्याची माहिती दापोलीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
साकुर्डे येथील विनोद बैकर हे ३१ मार्च रोजी गावातीलच देवरहाटीतील जंगलात दुपारी बंदूक घेऊन शिकारीसाठी गेले हाेते. तेथेच त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता. विनोद बैकर यांच्या मृतदेहाजवळ एक बंदूकही सापडली हाेती. मात्र, विनोद बैकर यांच्यासोबत संदेश सुरेश जोशी (२८), विनायक मनोहर बैकर हे साकुर्डे येथील दोनजण शिकारीला गेल्याचे तपासात उघड झाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
www.konkantoday.com