
रत्नागिरी येथील मुस्लिम समाजाच्या ह्युमिनिटी ग्रुप तर्फे मोफत रूग्णवाहिकेचा उपक्रम कौतुकास्पद—-जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा
रत्नागिरी येथील मुस्लिम समाजातील काही तरुणांनी हयुमिनिटी ग्रूप सुरु करून कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली हे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी काढले उधमनगर रत्नागिरी येथील महिला रुग्णालयाच्या आवारात जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या हस्ते मोफत रुग्णवाहिकेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तरुण मुलांचे भरभरून कौतुक करीत याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे आवाहन केले हयुमिनिटी ग्रुपच्या वतीने रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे, परंतु ही सेवा पूर्णपणे मोफत असेल असे अध्यक्ष शकील मुर्तुजा म्हणाले याप्रसंगी नगरसेवक मुसा काजी वरिष्ठ पत्रकार आलिमिंया काझी, युवा नेते साहिल पठाण, ईलू खोपेकर, मोहसिन काझी, शकील मोडक अजीज नाकाडे, सुहेल लाला, समाज कल्याण सभापती परशुराम कदम सिकंदर खान आदी उपस्थित होते,१५ दिवसापुर्वी याच तरुणांनी महिला रूग्णालया समोरील इमारतीची साफसफाई करुन लाईट,बेड,पाणी रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचे काम केले होतेविशेष म्हणजे हे सर्व तरूण न घाबरता महिला रुग्णालय व सिव्हिल हॉस्पिटल बाहेर मोफत सेवा देत सामाजिक कार्य करीत आहेत
www.konkantoday.com