
पावस-मावळंगेत पुन्हा बिबट्या दर्शन
रत्नागिरी तालुक्यातील पावस ते मावळंगे रस्त्यावर रात्रीच्या वेळी पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाले होते. चारचाकी वाहनांतून जाणार्या प्रवाशांनी रस्त्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याचे व्हिडिओ शुटींग केले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
शनिवारी रात्री साडेअकरा वाजता चारचाकी वाहनाने जाणार्या लोकांना बिबट्याचे दर्शन झाले. भक्ष्याच्या शोधात बिबट्या रस्त्याशेजारी दबा धरून असल्याचे दिसला. त्यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते नाना शिंदे यांनी या परिसरातील वाहनचालकांना रात्रीच्या वेळी सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
www.konkantoday.com