मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात जाण्यासाठी २३ एप्रिल ते ४ मे पर्यंत पोलीस खात्याकडे ७५०० पास आले. त्यातले फक्त ५०२ पास मंजूर झाले
आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता असून, यासाठी दररोज पाचशे अर्ज येत आहेत. रुग्णालयात जायचे आहे, हेच कारण बहुतांश अर्जांमध्ये नमूद असून, त्याची शहानिशा करूनच परवानगी दिली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी पासची आवश्यकता आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर गावी जाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर शहरात जाण्यासाठी २३ एप्रिल ते ४ मे पर्यंत पोलीस खात्याकडे ७५०० पास आले. त्यातले ५०२ पास मंजूर झाले, तर ७२८४ इतके पास नामंजूर केले, तर अजून ११ पास प्रलंबित आहेत
www.konkantoday.com